शरद पवार राजू शेट्टींचा गैरसमज दूर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:39 PM2022-04-04T18:39:01+5:302022-04-04T18:39:55+5:30

‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही.

Sharad Pawar will dispel the misconception of Raju Shetty | शरद पवार राजू शेट्टींचा गैरसमज दूर करणार

शरद पवार राजू शेट्टींचा गैरसमज दूर करणार

Next

कोल्हापूर : केंद्र सरकारविरोधात देशपातळीवर लढा देणाऱ्या राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनांसारख्या सर्वच संघटनांना त्यांच्यातील गैरसमज दूर करून एकत्रित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेट्टी यांचे गैरसमज दूर करणार असल्याचे संकेत दिले.

पत्रकार परिषदेत रविवारी पवार यांना राजू शेट्टी नाराज असून, महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी ही नाराजी दूर केली जाईल, असे सांगितले. पवार म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा वेळी देशभरातील शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढा देत आहेत. राजू शेट्टी यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्याची जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीतून कोणी बाहेर जावं असे आम्हाला वाटत नाही.

उसाची एफआरपी दोन टप्प्यांत द्यायला विरोध होत असल्याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी सांगितले की, ‘एफआरपी वेगवेगळी देणे तसे सोपे नाही. उसाचे गाळप करून जी साखर तयार होते त्यावर एफआरपी ठरविली जाते; परंतु एकदा साखर तयार झाल्यावर ती एकदम विकली जात नाही. त्यामुळे साठे करून ठेवावे लागतात. जर एकरकमी एफआरपी द्यायची झाली तर त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. मग अशा कर्जाचे व्याज शेतकऱ्यांवर पडते. त्याचा परिणाम उसाच्या किमतीवर पडतो. म्हणूनच जर कोणी एफआरपी वेगवेगळी करून देत असेल तर त्याला विरोध करायचे कारण नाही.’

भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर विचारले असता पवार म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने हिंदुत्वापेक्षा देशात महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; पण त्याकडे पाहायला केंद्र सरकार तयार नाही. नागरिकांना यातना होत असतानाही सरकार दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. जाती जातीत, धर्माधर्मात, भाषेभाषेत मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे; पण कांद्याच्या भाववाढीवरसुद्धा सरकारे पडल्याची उदाहरणे आहेत.’

राज ठाकरेंमध्ये गुणात्मक बदल

राज ठाकरे भूमिगत असतात. कधी तरी मेळावा घेऊन बाहेर येऊन राजकारणात पुन्हा सक्रिय होतात. आधी ते मोदींची स्तुस्ती करायचे. आता टीका करतात. त्यांच्यात गुणात्मक बदल झाल्याचे दिसून येते, असे पवार म्हणाले.

Web Title: Sharad Pawar will dispel the misconception of Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.