‘शरद पवार चले जाव’

By admin | Published: September 16, 2014 12:24 AM2014-09-16T00:24:05+5:302014-09-16T00:37:00+5:30

शिवाजी चौकात नारा : टोलविरोधी समितीचे धरणे आंदोलन

'Sharad Pawar will go away' | ‘शरद पवार चले जाव’

‘शरद पवार चले जाव’

Next

कोल्हापूर : कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला फसविणाऱ्या काँग्रेस आघाडी सरकारला घरी बसविण्याचा नारळ उद्या, मंगळवारी मिरजकर तिकटी येथे दुपारी तीन वाजता फोडण्याचा निर्धार आज, सोमवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने शिवाजी चौकात धरणे आंदोलनात केला. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘चले जाव, चले जाव, शरद पवार चले जाव’, ‘आय.आर. बी.ला हटवा, साथ में आघाडी सरकार हटाव’ असा नारा दिला.
कोल्हापूर टोलमुक्त होण्यासाठी आजपासून टोलविरोधी कृती समितीने कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघांत महिनाभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आय.आर.बी. व जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी रामभाऊ चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरच्या प्रश्नांत पवार यांनी लक्ष घातलेले नाही. त्यांनी टोलचा प्रश्न सोडवावा, अन्यथा त्यांनी येथून जावे. आंदोलनाला नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विनायक फाळके, माजी उपमहापौर संभाजी देवणे, नगरसेवक रमेश पुरेकर, आदींनी पाठिंबा दर्शविला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Sharad Pawar will go away'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.