‘शरद’अद्ययावत डिस्टिलरी प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:03+5:302020-12-22T04:25:03+5:30

खोची : पुढच्या गळीत हंगामाच्या प्रारंभापर्यंत प्रतिदिन ३० हजार लिटर निर्मिती करणारा ५९ कोटी ६७ लाख रुपयांचा अद्ययावत डिस्टिलरी ...

Sharad will set up an updated distillery project | ‘शरद’अद्ययावत डिस्टिलरी प्रकल्प उभारणार

‘शरद’अद्ययावत डिस्टिलरी प्रकल्प उभारणार

googlenewsNext

खोची : पुढच्या गळीत हंगामाच्या प्रारंभापर्यंत प्रतिदिन ३० हजार लिटर निर्मिती करणारा ५९ कोटी ६७ लाख रुपयांचा अद्ययावत डिस्टिलरी प्रकल्प शरद कारखाना सुरू करेल. सध्या पाच हजारांपर्यंत प्रतिदिन उसाचे गाळप केले जाते. ते टप्प्याटप्प्याने १० हजार टन करण्यात येणार आहे, तर १३ मेगावॅटचा कार्यरत असणारा सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा विस्तार करून तो २८ मेगावॅट निर्मितीचा केला जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी दिली.

नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याची २४ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर), उपाध्यक्ष थबा कांबळे प्रमुख उपस्थित होते.

मंत्री डॉ. राजेंद्र पाटील म्हणाले, शरद कारखान्याचे गतवर्षीचे साखर निर्यातीचे १५ कोटी रुपयांचे अनुदान केंद्र शासनाने दिलेले नाही. तसेच बफर स्टॉकचे व्याजही दिलेले नाही. ही थकीत रक्कम सरकारने त्वरित देणे गरजेची आहे. अशा परिस्थितीत शरद कारखाना मात्र पूर्ण क्षमतेने सुरू असून, प्रतिदिन ५१०० टनांनी गाळप सुरू आहे. यावेळी असिस्टंट कमाडंट महादेव कुंभार, जितेंद्र सांगावे, अनिल चौगुले, दिलीप फडणीस यांचा सत्कार झाला. संचालक रावसाहेब भिलवडे, लक्ष्मण चौगुले, अप्पासाहेब चौगुले, संजय बोरगावे, रविकांत कारदगे, गुंडा इरकर, संजय नांदणे, रावसाहेब चौगुले उपस्थित होते.

डी. बी. पिष्टे यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. आवटी यांनी अहवाल वाचन केले. बबन यादव यांनी आभार मानले.

........

रक्तदान शिबिर आयोजित करा

सहकारमहर्षी शामराव पाटील(यड्रावकर) यांचे स्वप्न मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मला मंत्रिपद देऊन पूर्ण केले आहे. जनतेची अविरत सेवा करीत विधायक विकासाची चळवळ गतिमान करण्याकामी मी प्राधान्याने प्रयत्नशील राहणार आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी गावोगावी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यड्रावकर यांनी केले.

फोटो ओळी - शरद सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत मंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमरसिंह पाटील, थबा कांबळे, रावसाहेब भिलवडे, डी. बी. पिष्टे उपस्थित होते.(छाया-अनंतसिंग)

Web Title: Sharad will set up an updated distillery project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.