शाहुवाडीत मुंडन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:22+5:302021-06-04T04:19:22+5:30

मलकापूर : राज्यातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ३३ टक्के पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय दलित ...

Shaving in Shahuwadi | शाहुवाडीत मुंडन

शाहुवाडीत मुंडन

Next

मलकापूर : राज्यातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ३३ टक्के पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या वतीने शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी केले.

श्रीकांत कांबळे म्हणाले, तत्कालीन सरकारने मागासवर्गीय पदांना हात न लावता उर्वरित पदे खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेतला होता.

घटनात्मकदृष्ट्या पदोन्नतीचे आरक्षण रोस्टर व बिंदूनामावलीप्रमाणे देणे बंधनकारक असताना राज्य सरकार अधिकारी व कर्मचारी यांची फसवणूक व संविधानाचा अवमान करीत आहेत.

महाविकास आघाडी सरकाने घेतलेला निर्णय हा पूर्णत: घटनाबाह्य आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.

आंदोलनात सागर घोलप, चंद्रकांत काळे, प्रदीप माने, आकाश कांबळे, पंकज घोलप, गणेश कांबळे, संजय बनसोडे, रोहित कांबळे, महेंद्र जाधव, दयानंद कांबळे, प्रणय कांबळे आदी भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

०३ शाहुवाडी मुंडण आंदोलन

फोटो

शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर भारतीय दलित महासंघाच्या वतीने सुरू असलेले उपोषण -

Web Title: Shaving in Shahuwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.