चारित्र्याच्या संशयावरून महिलेचे मुंडण; पतीसह तिघांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 01:49 AM2020-06-14T01:49:57+5:302020-06-14T01:51:31+5:30
विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी मारहाण
कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) : चारित्र्याच्या संशयावरून तेरवाड (ता. शिरोळ) येथील एका विवाहित महिलेचे मुंडण केल्याप्रकरणी पती, सासूसह तिघांना शनिवारी अटक करण्यात आली.
पती मनोज श्रीकांत बागडी, सासू शांताबाई श्रीकांत बागडी व दीर गणपती श्रीकांत बागडी (तिघे रा. गंगापूर, तेरवाड, ता. शिरोळ) अशी या संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी मारहाण केली. पती, सासू, दीर या तिघांनी वस्ताऱ्याने महिलेचे मुंडण केले होते. पीडित महिलेचे माहेर कुन्नूर (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असून तिला दोन वर्षाचा एक मुलगा व पाच वर्षाची मुलगी आहे.
चारित्र्याचा मापदंडच चुकीचा आणि दुटप्पी आहे. मुंडण करणे, अॅसिड फेकणे, मारझोड करणे हे महिलेचा आत्मसन्मान दुखावण्यासाठीच जाणीवपूर्वक केले जात आहेत.
- गिरीश फोंडे, सामाजिक कार्यकर्ते
कायदेशीर मार्ग असतानाही आपण तिचे मालक असल्याने आपणच तिचा निकाल लावायचा, ही मानसिकता हिंसाचारापेक्षाही वाईट आहे.
- आरती रेडेकर, सामाजिक कार्यकर्त्या