पेईंग गेस्ट म्हणून आली अन् डल्ला मारून गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 02:17 PM2020-07-04T14:17:44+5:302020-07-04T14:18:47+5:30

पेईंग गेस्ट म्हणून घरी राहण्यास आलेल्या तरुणीने सोन्याच्या दागिने व विविध बँक खात्यांतील रकमेसह ९४ हजारांची चोरी केल्याप्रकरणी संशयित स्नेहा दिलीप सातपुते (रा. सुभाषनगर) हिच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी रोहिणी रमेश होनमोरे (वय ३१, रा. विशालतीर्थ पार्क, चौगुले मळा, शिंगणापूर, ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

She came as a paying guest and killed Andalla | पेईंग गेस्ट म्हणून आली अन् डल्ला मारून गेली

पेईंग गेस्ट म्हणून आली अन् डल्ला मारून गेली

Next
ठळक मुद्देपेईंग गेस्ट म्हणून आली अन् डल्ला मारून गेलीसोने, रोकड अशी ९४ हजारांची लूट

कोल्हापूर : पेईंग गेस्ट म्हणून घरी राहण्यास आलेल्या तरुणीने सोन्याच्या दागिने व विविध बँक खात्यांतील रकमेसह ९४ हजारांची चोरी केल्याप्रकरणी संशयित स्नेहा दिलीप सातपुते (रा. सुभाषनगर) हिच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी रोहिणी रमेश होनमोरे (वय ३१, रा. विशालतीर्थ पार्क, चौगुले मळा, शिंगणापूर, ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुणी १३ मे २०२० ते १९ जून २०२० पर्यंत फिर्यादीच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. या दरम्यान तिने मोबाईलद्वारे विविध बँक खात्यांतून वेळोवेळी १५ हजार रुपये काढून घेतले; तर कपाटात ठेवलेल्या २२ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या अंदाजे किंमत ६६ हजार असा ९४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

यासोबत तिने फिर्यादीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, घराची कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला, सहीची सॉफ्ट कॉपी असे गुगल ॲपद्वारे चोरून नेल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली असून साहाय्यक फौजदार भगवान गिरीगोसावी तपास करीत आहेत.

Web Title: She came as a paying guest and killed Andalla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.