‘त्या’ कुमारी मातेला अपत्यप्राप्ती, सख्ख्या भावावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 05:56 PM2019-06-08T17:56:14+5:302019-06-08T17:57:58+5:30
शाहूवाडी तालुक्यातील एका गावातील १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी कुमारी माता बनली. सख्ख्या भावाकडूनच हे निंदनीय कृत्य घडले आहे. त्याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सुधारगृहात रवानगी केली. कुमारी मातेला मुलगा झाल्याने तिच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडल्याने समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील एका गावातील १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी कुमारी माता बनली. सख्ख्या भावाकडूनच हे निंदनीय कृत्य घडले आहे. त्याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची सुधारगृहात रवानगी केली. कुमारी मातेला मुलगा झाल्याने तिच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडल्याने समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी सांगितले, शाहूवाडी तालुक्यातील एका गावात शेतकरी कुटुंबात पीडित मुलगी नववीमध्ये शिकते. तिचा थोरला भाऊ सतरा वर्षांचा आहे. आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती गरिबीची आहे. आई-वडील दिवसभर मोजमजुरीसाठी बाहेर जात असत. याच संधीचा फायदा घेत भावाने बहिणीलाच शिकार बनविले. तिला त्रास होऊ लागल्याने १२ मार्च रोजी आईने मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले. तिच्याकडे विचारपूस केली असता सख्ख्या भावाकडूनच हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले.
हे ऐकून आई-वडिलांनाही धक्का बसला. मुलीला सीपीआर रुग्णालयात दाखल केल्यानंतर शाहूवाडी पोलिसांत हे प्रकरण गेले. पोलिसांनी संबंधित भावाला ताब्यात घेऊन त्याची सुधारगृहात रवानगी केली. शनिवारी पीडित मुलीची प्रसूती झाली. तिला मुलगा झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.