ती चा गणपती

By admin | Published: September 18, 2015 10:57 PM2015-09-18T22:57:25+5:302015-09-18T23:10:14+5:30

‘लोकमत सखी गणेश मंडळा’चा कृतिशीलतेचा संदेश

She is of Ganpati | ती चा गणपती

ती चा गणपती

Next

सांगली : ‘लोकमत’ने यंदाच्या गणेशोत्सवात कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या ‘आपले बाप्पा’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. याला पहिला कृतिशील प्रतिसाद ‘लोकमत सखी मंच’ने दिला. महिलांच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ असलेल्या सखी मंचने ‘ती’चा गणपती हा अभिनव उपक्रम सुरू केला. ‘लोकमत सखी मंच’च्या सभासदांनी ही संकल्पना ऐकली आणि सांगलीत तिला प्रत्यक्ष स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ‘लोकमत सखी गणेश मंडळा’ची स्थापना करण्यात आली. मूर्तीच्या निवडीपासून ते सजावटीपर्यंत आणि प्राणप्रतिष्ठापनेपासून ते खिरापतीच्या निवडीपर्यंत सगळ्या गोष्टी या मंडळाने ठरविल्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच गणेशमूर्ती आणल

‘लोकमत’च्या सांगली कार्यालयात शुक्रवारी सकाळी श्री गणेशाची आरती अ‍ॅड. स्वरदा केळकर, डॉ. हर्षला पटवर्धन, मैत्रीण संघटनेच्या नीता केळकर यांच्याहस्ते, तर सायंकाळची आरती श्वेता शेठ, सुधाताई हातकणंगलेकर, नवजीवन शाळेच्या रेवती हातकणंगलेकर, सुजाता पाटील, सीमा लाड यांच्याहस्ते करण्यात आली.ी.

महिला सबलीकरणाची अभिनव चळवळ
त्रीला चार भिंतींच्या आतून बाहेर पडण्यासाठी गणेशोत्सव सोहळा हे फार मोठे निमित्त मिळाले. ‘लोकमत’ने सांगलीतही ही सुरुवात केलीय, त्याचा सार्थ अभिमान वाटतो. महिलांनी एकजूट करून पूजाविधीही आनंदाने साजरा केला. असेच एकत्र येऊन सर्वजण सर्वांच्या सुख-दु:खात सहभागी झाले, तर लोकमान्य टिळकांचा उद्देश साध्य होईल. शेवटी उत्सव, सणांना धार्मिकतेची झालर मिळाली, तर तो बाप्पा आपल्याला, आपल्या देशाला सुजलाम् सुफलाम् करेल.
- सौ. नीला अविनाश जोशी

‘लोकमत’ महिला सखी मंचमुळे आमच्यातील दडपलेल्या ऊर्जेला चांगली वाट मिळाली. स्त्रियांना व्यासपीठ मिळाले. ‘लोकमत’ सखी मंच महिला मंडळाचा सांगलीतील हा पहिलाच गणपती आहे. लेझीम, फुगडी खेळत, झिम्मा-फेर धरून, वाजत-गाजत गणपती बाप्पा आला. अशाच जोशात, आनंदात, जल्लोषात सखी मंच महिलांच्यावतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात महिलांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा व्हावा.
गणपती बाप्पा मोरया...
- सौ. पद्मा विठ्ठल मस्के

‘सखी मंच’च्या आगळ्यावेगळ्या दिशेला मानाचा मुजरा! सर्व आघाड्यांवर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वत:ला सिद्ध करू पाहणाऱ्या आजच्या ‘स्त्री’ला स्वत:साठी, स्वत:च्या छंदासाठी मात्र वेळ काढता येत नाही. हीच गोष्ट हेरून महिलांची कारकीर्द आणि क्षमता केवळ कुटुंबापुरतीच मर्यादित राहू नये, त्यांच्या ऊर्जेला, त्यांच्या क्षमतेला वेगळी वाट, वेगळी दिशा मिळण्यासाठी ‘सखी मंच’ने आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. गणेशाच्या प्रतिष्ठापनेने एका आगळ्यावेगळ्या महिला गटाला नक्कीच चांगले व्यासपीठ मिळाले आहे. श्री गणेशाची प्रतिष्ठापना आणि आरती स्त्रियांच्या हातून होत आहे, या उपक्रमामुळे स्त्रियांच्या भक्तिभावाला देखील चांगली वाट मिळेल यात वादच नाही.
- प्रा. सौ. प्रज्ञा सागर जोशी

मी ‘लोकमत’ सखी मंच स्थापनेपासून सदस्या आहे. ‘लोकमत’ने आम्हा सखींना आमच्यातील सुप्तगुणांना, कलागुणांना वाव दिला, मैत्रिणी दिल्या. पण यावर्षी तर खूप काही दिले. आमच्या सखींचा गणपती, आमच्या महिला मंडळाचा गणपती... वाह! खरे तर इतका आनंद झाला की, क्षणभर डोळ्यात पाणी आले. सांगलीतले पहिले महिला गणपती मंडळ म्हणजे ‘ती’चा गणपती! आमच्या घरचा गणपती बसवून आम्ही या गणपतीच्या स्वागतासाठी आलो. खूप उत्साही वातावरण... फेटे, मिरवणूक, लेझीम, फुगड्या, गणपतीच्या नावाचा जयजयकार... खूप खूप बरे वाटले. पुढच्यावर्षी पुन्हा नव्या जोमाने सहभागी होऊ. ‘लोकमत’चे खूप आभार.
- सौ. गीतांजली विजयकुमार उपाध्य्ये

‘लोकमत’चा महिला मंडळाचा पहिलाच गणपती आहे. पुणे, नागपूरनंतर सांगलीत सखींच्यावतीने गणपतीची प्रतिष्ठापना केली. लेझीम व फुगड्यांच्या मदतीने मिरवणूक काढण्यात आली. सर्व सखी हिरव्या साडीमध्ये उठून दिसत होत्या, जणू सगळीकडे हिरवळ पसरली आहे. तो आनंद सखींसाठी खूप मोठा होता.
- सौ. अलका बाळासाहेब पाटील

Web Title: She is of Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.