ती शववाहिका सेवेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:23 AM2021-05-23T04:23:03+5:302021-05-23T04:23:03+5:30
कोल्हापूर : सेवाभावी वृत्तीने देण्यात आलेली शववाहिका सुरू आहे. तिचे टायर काही प्रमाणत खराब झाले आहेत. गरज असल्यास ...
कोल्हापूर : सेवाभावी वृत्तीने देण्यात आलेली शववाहिका सुरू आहे. तिचे टायर काही प्रमाणत खराब झाले आहेत. गरज असल्यास नवीन टायर बसविण्याचीही तयारी महापालिका प्रशासनाची आहे. यामुळे जिल्हा बैतूलमाल कमिटीकडील ती रुग्ण्वाहिका सेवेतच राहील, अशी माहिती उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कोरोनामुळे शहरात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत शव नेण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विशेष पुढाकार घेतला. शव वाहतुकीसाठी समाजातील दानशूर आणि स्वयंसेवी संस्थांना वाहन देण्याचे आवाहन केले होते. यानुसार अयोध्या ग्रुपचे व्ही. बी. पाटील यांनी वाहन उपलब्ध करून दिले. त्यांनी दिलेले वाहन जिल्हा बैतूलमाल कमिटीकडे आहे.
शव नेण्यासाठी त्याचा चांगला वापर होत आहे. पण सध्या ते वाहन टायर चांगले नसल्याने कावळा नाका येथे थांबून आहे. वाहन पुन्हा सेवेत येण्यासाठी टायर बसवून दयावेत, अशी मागणी माजी नगरसेवक तौफिक मुल्ला यांनी आयुक्तांकडे ईमेलव्दारे केली. याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने त्या वाहनाच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्या वाहनाचे टायर काही प्रमाणात झिजले असले तरी वाहन चालू शकते, अशी स्थिती असल्याचे दिसून आले. तरीही गरज लागली तर त्या वाहनास नवीन टायर बसविण्याचीही तयारी प्रशासनाने केली आहे.