आमच्या नावाशिवाय शेट्टींना झोप लागत नाही : सदाभाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:16 PM2017-09-28T23:16:07+5:302017-09-28T23:16:07+5:30

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : मला लंकेत पाठविल्याचे बोलून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ हनुमान होता, हे मान्य केले आहे.

 Sheets do not sleep without our name: Sadabhau | आमच्या नावाशिवाय शेट्टींना झोप लागत नाही : सदाभाऊ

आमच्या नावाशिवाय शेट्टींना झोप लागत नाही : सदाभाऊ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : मला लंकेत पाठविल्याचे बोलून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ हनुमान होता, हे मान्य केले आहे. मला हनुमान म्हणणाºया लंकापतींनी रयत कोणत्या बाजूने आहे, हे पाहावे. आमचे नाव घेतल्याशिवाय त्यांना हल्ली झोपच लागत नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

नव्याने स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खोत म्हणाले, आदी मानवाला शेपूट होती. ती नष्ट झाल्यानंतरच तो दोन पायाचा माणूस झाला, असा डार्विनचा सिद्धांत सांगतो. त्यामुळे सदाभाऊ आता माणूस बनला आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांना तीन वर्षापर्यंत सरकार चांगले काम करत नसल्याचे समजले नाही.
मात्र, निवडणुकीला दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांना सरकार नको झाले आहे. सत्तेत राहिल्यास जनता प्रश्न विचारेल. त्यामुळे बाहेर पडून सरकारविरोधी दंगा करून जनतेची सहानुभूती मिळावी. तसेच चर्चेत राहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज व्हावी, म्हणून बोलत राहायचे, एवढेच धोरण त्यांनी सध्या अवलंबले आहे.

लढा यशस्वी करणारे शहर
लढा कसा सुरू करावा, तो कसा यशस्वी करावा, हे इचलकरंजी शहरातून घेण्यासारखे आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी हे शहर निवडल्याचे खोत यांनी सांगितले.

Web Title:  Sheets do not sleep without our name: Sadabhau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.