शेकापची भूमिका दोन दिवसात ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:02+5:302021-04-21T04:24:02+5:30
कोल्हापूर : विरोधी आघाडीकडून उमेदवारीत डावलले गेल्याने दुखावलेल्या शेकापने आता कुणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ...
कोल्हापूर : विरोधी आघाडीकडून उमेदवारीत डावलले गेल्याने दुखावलेल्या शेकापने आता कुणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. शेकापचे नेते माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसात प्रमुख कार्यकर्ते व ठरावधारकांची बैठक होईल असे पक्षाचे तालुका सरचिटणीस केरबा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे.
विरोधी शाहू शेतकरी आघाडीकडून एका जागेची मागणी केली होती. शेकापकडून बाबासाहेब देवकर व केरबा पाटील यांनी अर्जही भरले होते. मंगळवारी या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत, पण शेकापचा पाठिंबा कोणाला राहील, याबाबतीतील निर्णय बैठकीनंतरच ठरणार आहे. गोकुळ बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेकापने गेल्या दहा वर्षापासून भ्रष्ट कारभाराविरोधात रस्त्यावरील लढाई केली आहे. पण उमेदवारी देताना संघर्षाचा विचार केला नसल्याने नाराजी आहे. देवकर यांना अन्यत्र सत्तेत संधी देऊन शेकापची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न विरोधी आघाडीकडून सुरू आहेत.