Kolhapur: ग्रामस्वच्छतेमध्ये पुणे विभागात शेळकेवाडी प्रथम, बारा लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:55 PM2024-10-15T12:55:49+5:302024-10-15T12:56:32+5:30

कोल्हापूर : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ...

Shelkewadi first in Pune division in village cleanliness, award of twelve lakh rupees announced | Kolhapur: ग्रामस्वच्छतेमध्ये पुणे विभागात शेळकेवाडी प्रथम, बारा लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर

Kolhapur: ग्रामस्वच्छतेमध्ये पुणे विभागात शेळकेवाडी प्रथम, बारा लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती उपआयुक्त (विकास) तथा विभागस्तरीय तपासणी समितीचे सदस्य सचिव विजय मुळीक यांनी कळविली आहे. १२ लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.

विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळालेल्या ग्रामपंचायतींची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील विभागस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, प्रभारी उपसंचालक (माहिती), पुणे वर्षा पाटोळे, सहायक आयुक्त विकास, पुणे डॉ. सोनाली घुले यांचा या समितीमध्ये समावेश होता. ग्रामस्वच्छतेसाठी शेळकेवाडी ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवून स्वच्छता टिकवण्यासाठीही ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सातत्य ठेवले.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम (१२ लक्ष), सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव द्वितीय (९ लक्ष) आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कवठे ग्रामपंचायतीला तृतीय (७ लक्ष) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Shelkewadi first in Pune division in village cleanliness, award of twelve lakh rupees announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.