शेंडूरकरांची रुग्णसेवा कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:18 AM2021-05-28T04:18:52+5:302021-05-28T04:18:52+5:30

साके ः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही बाब गंभीर आहे. शेंडूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने सुरू ...

Shendurkar's patient service is commendable | शेंडूरकरांची रुग्णसेवा कौतुकास्पद

शेंडूरकरांची रुग्णसेवा कौतुकास्पद

Next

साके ः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही बाब गंभीर आहे. शेंडूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटरचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे यांनी काढले. त्यांनी शेंडूर येथे मानव हायस्कूलमधील सेंटरला भेट देवून आपल्या भावना व्यक्त केली. त्यांनी रुग्णांची विचारपूस केली आणि येथील रुग्ण सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पीपीइर् किट, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमिटर, मास्क, हॅन्ड ग्लोज इत्यादी साहित्याचे वाटप केले.

घाटगे म्हणाले, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडून सर्वत्र झिरो रुग्णसेवा मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेसाठी सर्वांनी योगदान देऊन कोरोनाला हद्दपार करू या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोविड केंद्रामध्ये रुग्णसेवा बजावणाऱ्या डॉ. एस. आर. यादव, आरोग्यसेविका गीतांजली रणदिवे, मदतनीस सुमन मोरे, मुख्याध्यापक टी. व्ही. कुंभार, ग्रामसेवक एस. वाय. मगदूम यांच्या कामाचे घाटगे यांनी कौतुक केले.

यावेळी शेंडूरचे सरपंच अमर कांबळे उपसरपंच अजित डोंगळे, गुणाजी काका निंबाळकर, मधुकर भांडवले, सचिन माने, सुहास पाटील, बाबुराव शेवाळे, निखिल निंबाळकर, सुखदेव मेथे, निवृत्ती निकम, राजू मुजावर, अजित मोरे, संदीप लाटकर उपस्थित होते.

फोटो ओळी ःशेंडूर ता. कागल येथे वैद्यकीय साहित्याचे वाटप जि. प. सदस्य अंबरिष घाटगे, सरपंच अमर कांबळे, उपसरपंच अजित डोंगळे आदी मान्यवर होते.

Web Title: Shendurkar's patient service is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.