मनमंदिर बचत गटातर्फे स्मशानभूमीस शेणी दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:16 AM2021-06-23T04:16:11+5:302021-06-23T04:16:11+5:30
कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ व कैलास गडची स्वारी भागातील मन मंदिर स्वयं सहायता महिला बचत गटातर्फे पंचगंगा ...
कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ व कैलास गडची स्वारी भागातील मन मंदिर स्वयं सहायता महिला बचत गटातर्फे पंचगंगा स्मशानभूमीस पाच हजार शेणी दान करण्यात आल्या. कोरोना कालावधीत मृतदेहावर दहन करण्यासाठी शेणी अपुऱ्या पडत असल्याने हा हातभार लावण्यात आला. यावेळी मन मंदिर बचत गटाच्या अध्यक्षा रुक्मिणी शिंदे, माजी नगरसेविका शारदा संभाजी देवणे, सुनंदा बाबर, भारती फडतारे, ज्योती डाकवे, दया सरनोबत, माजी उपमहापौर संभाजी देवणे, पांडुरंग शिंदे, भगवान घोरपडे, पोलीस पाटील नितीन घोरपडे आदी उपस्थित होते.
फोटो नं. २२०६२०२१-कोल-मनमंदिर बचत ग्रुप
ओळ : मन मंदिर महिला बचत गटातर्फे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान करण्यात आल्या.
===Photopath===
220621\22kol_1_22062021_5.jpg
===Caption===
ओळ : मनमंदिर महिला बचत गटातर्फे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान करण्यात आल्या.