संतोष गायकवाड स्मृतीदिनानिमित्त शेणीदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:34+5:302021-06-04T04:18:34+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक व राष्ट्रीय फुटबाॅलपटू संतोष गायकवाड यांच्या पहिल्या स्मृतीदिनी स्वर्गीय संतोष गायकवाड फाउंडेशन व संयुक्त ...
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक व राष्ट्रीय फुटबाॅलपटू संतोष गायकवाड यांच्या पहिल्या स्मृतीदिनी स्वर्गीय संतोष गायकवाड फाउंडेशन व संयुक्त गडगडाट बाॅईजतर्फे शेणीदानसह, रुग्णांना फळे, गरजूंना अन्नधान्य वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात महापालिका गटनेते व माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत झाली. यानिमित्त पंचगंगा स्मशानभूमीस पाच हजार शेणी दान करण्यात आल्या. सीपीआर, आयसोलेशन, शेंडापार्क कोविड सेंटरसह शहरातील विविध कोवीड रुग्णालयातील रुग्णांसह नातेवाईकांना फळे, जेवणाची पाकीटे, पाणी बाॅटल्स, सॅनिटायझर आदी वस्तुंचे वाटप करण्यात आले. शिरोली नाका येथील विट्टभट्टी कामगार, रुईकर काॅलनी परिसरातील मूर्तीकार कुटूंबिय, सीबीएस, रेल्वे स्टेशन आदी परिसरातील गरजूंनाही ही मदत देण्यात आली.
फोटो : ०३०६२०२१-कोल-गायकवाड
आळी : माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त गरजूंना जेवणाच्या पाकिटांसह फळे वाटप करण्यात आली.
सोनाळकर यांचा निवृत्तीनिमित्त गौरव
कोल्हापूर : येथील न्यू काॅलेजचे प्रबंधक हिंदुराव सोनाळकर गुरुवारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. व्ही.एम. पाटील यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करून निरोप देण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य डाॅ. ए.एम.शेख, टी.के.सरगर, एम.वाय.कांबळे, प्रा. रघुनाथ ढमकले, , डाॅ.निलेश पवार, डाॅ. वृषाली पाटील, न्यू काॅलेज सेवकांची पतसंस्थेचे चेअरमन चेतन पाटोळे आदी उपस्थित होते. प्रा. शकील इनामदार यांनी आभार मानले.
फोटो : ०३०६२०२१-कोल-न्यू काॅलेज
ओळी : न्यू काॅलेजचे प्रबंधक हिंदुराव सोनाळकर यांचा निवृत्तीनिमित्त गुरुवारी प्राचार्य डाॅ. व्ही.एम.पाटील यांच्या हस्ते सपत्निक गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृहात प्रवेश सुरू
कोल्हापूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील मागासवर्गीय मुलांसाठी शासनमान्य अनुदानित वसतिगृहात २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षांसाठी ५ वी ते दहावीपर्यंतच्या वर्गासाठी प्रवेश सुरू आहे. वसतिगृहातील मुलांना वर्षभर मोफत राहण्यासह शिक्षण, आहाराची मोफत सोय केली आहे. तरी गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन अधीक्षक कुमार कुरणे यांनी केले आहे.