शियेत कचऱ्याचे ढीग, उचलण्यासाठी घंटागाडी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:49+5:302021-02-06T04:43:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिये : शिये (ता. करवीर) येथील उपनगरांमध्ये कचऱ्याचे ढीगच्या ढीग साठले आहेत. हा कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीने ...

Shiite garbage heaps, no bell carts to pick up | शियेत कचऱ्याचे ढीग, उचलण्यासाठी घंटागाडी मिळेना

शियेत कचऱ्याचे ढीग, उचलण्यासाठी घंटागाडी मिळेना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

शिये : शिये (ता. करवीर) येथील उपनगरांमध्ये कचऱ्याचे ढीगच्या ढीग साठले आहेत. हा कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीने घंटागाडीची सुविधा उपलब्ध न केल्याने कचरा रोडवरच विखुरला आहे. परिणामी, राम नगर व हनुमान नगर या भागात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या भागासाठी घंटागाडीची सोय करुन नियमितपणे कचरा उचलावा, अशी मागणी होत आहे. शिये येथील कचरा नेण्याकरिता सध्या एक घंटागाडी व चार सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. संपूर्ण गाव हे भौगोलिक दृष्टीने सहा विभागांमध्ये विभागले आहे. औद्योगिक क्षेत्राला लागूनच शिये येथील हनुमान नगर, राम नगर ही उपनगरे आहेत. जवळच असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामुळे मुख्य गावभागाऐवजी उपनगरे झपाट्याने वाढल्याने येथील सार्वजनिक समस्यादेखील वाढत आहेत. येथील कचरा उचलण्याकरिता ग्रामपंचायतीची घंटागाडी किमान सात दिवसांनी येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, अशातच गेेेले दोन महिने घंटागाडी बंंदावस्थेत असल्याने कचरा उचललेला नाही. परिणामी घरातील कचरा लोक रस्त्यावर खुलेआम टाकत आहेत. अनेकवेळा हा कचरा पेटवला जात असल्याने धुराचे लोट हवेत पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राम नगरमधील कमानीशेजारील मुख्य रस्ता, पंडित हाॅटेलशेजारी व हनुमान नगर येथील पाण्याची टाकी, नवजीवन पेपर स्टाॅलशेजारी व औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठल्याने उपनगरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

गाऱ्हाणी मांडायची कुणाकडे

सध्या ग्रामपंचायतीवर सुनीलकुमार गायकवाड हे प्रशासक आहेत. कचऱ्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते फोनच उचलत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.

कोट :- कचऱ्याचे ढीग वारंवार पेटवले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, ग्रामपंचायतीने गावभागाव्यतिरिक्त हनुमान नगर, राम नगर याकरिता दोन सफाई कर्मचारी व स्वतंत्र घंटागाडी नेमावी. - अमर जाधव, ग्रामस्थ, हनुमान नगर, शिये

फोटो : ०५ शिये कचरा

ओळ : शिये (ता. करवीर) येथील शिये - बावडामार्गे कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेलाच कचरा साठला आहे. ( फोटो, हरी बुवा )

Web Title: Shiite garbage heaps, no bell carts to pick up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.