शिक्षक बँक, ‘कोजिमाशि’ची रणधुमाळी डिसेंबरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:31 AM2021-09-16T04:31:04+5:302021-09-16T04:31:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था (कोजिमाशि) या संस्थांची निवडणूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था (कोजिमाशि) या संस्थांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात असून, साधारणता डिसेंबर महिन्यात रणधुमाळी उडणार आहे. सहकारी निवडणूक प्राधीकरणाने पहिल्या टप्प्यात ६२४ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली आहे. अंतिम यादी झालेल्या २७९ संस्थांसह ५९३ संस्थांच्या याद्या नव्याने कराव्या लागणार आहेत. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्राधीकरणाने परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील ६२४ संस्थांची प्रक्रिया सोमवार (दि. २०) पासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ६२४ पैकी २७९ संस्थांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती. १२० संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मंजूर झाला होता, तर ३१ संस्थांची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यास सुरुवात झाली होती. या ३१ संस्था वगळता ५९३ संस्थांच्या मतदार याद्या नव्याने तयार केल्या जाणार आहेत. ‘गोकुळ’, जिल्हा बँकेनंतर शिक्षक बँक, ‘कोजिमाशि’, ‘राजाराम कारखाना’च्या निवडणुकीबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. ‘राजाराम’ची निवडणूक न्याय प्रविष्ठ आहे. त्यामुळे शिक्षक बँक व ‘कोजिमाशि’ संस्थांच्या निवडणुकीकडे नजरा लागल्या आहेत. या दोन्ही संस्थांच्या निवडणुका तिसऱ्या टप्यात होणार असून, साधारणता डिसेंबरमध्ये रणधुमाळी सुरू होणार आहे.
(आकडेवारीची जोड चौकट देत आहे....)