कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा शिंदेसेना लढवणार, जयसिंगपूर येथे बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 17:53 IST2024-07-04T17:52:24+5:302024-07-04T17:53:31+5:30
जयसिंगपूर : शिंदेसेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढविण्याबाबत निर्धार व सर्व उमेदवारांना ताकदीने विजयी करून मुख्यमंत्री ...

कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा शिंदेसेना लढवणार, जयसिंगपूर येथे बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्णय
जयसिंगपूर : शिंदेसेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढविण्याबाबत निर्धार व सर्व उमेदवारांना ताकदीने विजयी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासह इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी विधानसभा लढवावी, अशा विविध निर्णयांनी शिंदेसेनेची बैठक संपन्न झाली.
शिरोळ तालुक्यातील शिंदेसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी येथील जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी दहा वाजता झाली. स्वागत उपतालुकाप्रमुख संभाजी गोटे यांनी केले. यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
जिल्हाप्रमुख रवींद्र माने म्हणाले की, शिरोळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्य दिल्याबद्दल शिरोळ विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा, नगरपालिका या निवडणुकांमध्ये सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याची प्रमुख भूमिका असेल, असे सांगितले.
यानंतर पक्षबांधणीबाबत सभासद नोंदणी अभियान, गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तसेच शासकीय योजनांच्या माहितीबाबत मार्गदर्शन असे उपक्रम प्रामुख्याने राबवावेत, असे उपतालुकाप्रमुख सतीश मलमे यांनी सांगितले. तर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे यांनी लोकसभा निवडणुकीत युवकांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत जास्तीत जास्त युवकांना संधी मिळावी. त्याची सुरूवात इचलकरंजी शहरातून करूया. इचलकरंजी मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. अनिल क्षीरसागर यांनी आभार मानले.