शिंदेवाडीच्या पिता-पुत्रांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:24+5:302021-05-06T04:25:24+5:30
ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर भाऊराव हे शिंदेवाडीचे पहिले सरपंच झाले. किसान दूध संस्थेचे ते संस्थापक-अध्यक्षही होते. त्यांचे एकुलते सुपुत्र मनोहर महाडिक ...
ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर भाऊराव हे शिंदेवाडीचे पहिले सरपंच झाले. किसान दूध संस्थेचे ते संस्थापक-अध्यक्षही होते. त्यांचे एकुलते सुपुत्र मनोहर महाडिक हे गावचे पोलीसपाटील होते. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले होते.
गडहिंग्लज तालुका पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
गेल्या आठवड्यात दोघांनाही कोरोनाची लागण झाली. भाऊराव यांच्यावर गडहिंग्लजमध्ये, तर मुलगा मनोहर यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू होते. दरम्यान, रात्री आठच्यासुमारास भाऊराव यांचा, तर दहाच्यासुमारास यांचा मृत्यू झाला.
मनोहर यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--------
फोटो -
टोपी व चष्मा - मनोहर महाडिक
गांधी टोपी - भाऊराव महाडिक