कोल्हापूर येथील शिरीष पाटील यांना मदर तेरेसा गोल्ड मेडल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 01:24 PM2019-04-06T13:24:31+5:302019-04-06T13:31:51+5:30
येथील नामवंत डॉक्टर शिरीष पाटील यांना भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आॅल इंडिया अॅचिव्हर्स रिसर्च अकॅडमी, नवी दिल्ली यांच्या वतीने
कोल्हापूर : येथील नामवंत डॉक्टर शिरीष पाटील यांना भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आॅल इंडिया अॅचिव्हर्स रिसर्च अकॅडमी, नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार बंगलोर येथे झालेल्या समारंभामध्ये प्रदान करण्यात आला.
डॉ. पाटील गेली ३० वर्षे होमिओपॅथीचे नामवंत डॉक्टर म्हणून कार्यरत असून, अनेक सामाजिक, लोकोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे. येथील वेणुताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गेली ३० वर्षे ते शैक्षणिक कार्य करीत असून, या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण कामांची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला बंगलोर येथील लायन्स क्लबचे गव्हर्नर नारायणमूर्ती, प्रतिनिधी धनलक्ष्मीकुमार, कोचीन येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रमुख सी. एन. नारायण उपस्थित होते.