शिरोळ बंधाऱ्याला जलपर्णीने व्यापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:17 AM2021-06-17T04:17:01+5:302021-06-17T04:17:01+5:30
शिरोळ : येथील शिरोळ बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन तटली आहे. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात नदी ...
शिरोळ : येथील शिरोळ बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन तटली आहे. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात नदी प्रदूषण आणि जलपर्णी हे नित्याचे समीकरण बनले आहे. त्यामुळे या प्रदूषणापासून पंचगंगेची मुक्तता केव्हा होणार, असा प्रश्न पंचगंगा काठच्या नागरिकांतून उपस्थित होत आहे.
शिरोळ तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे तालुका समृध्द आहे. असे असले तरी उन्हाळ्याच्या सुरुवातीस पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न आ वासून उभा राहतो. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांसह संघटनांकडून आंदोलन उभारले जाते. मात्र, प्रद\ूषण नियंत्रण मंडळाकडून जुजबी कारवाई पलीकडे काहीच होत नाही. तद्नंतर प्रदूषण वाढून नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य पसरायला सुरुवात होते. बघता बघता पूर्ण पात्र जलपर्णीमय बनते. त्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडतात. अशातच ही जलपर्णी शिरोळ बंधाऱ्याला येऊन तटली आहे. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला असून ही जलपर्णी हटवून नदीचे पात्र मोकळे करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो - १६०६२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील बंधाऱ्याला अशाप्रकारे जलपर्णी येऊन तटली आहे. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)