शिरोळ बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:02+5:302021-07-14T04:30:02+5:30
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील जुना कुरुंदवाड-शिरोळ मार्गावरील पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील ...
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील जुना कुरुंदवाड-शिरोळ मार्गावरील पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील कृष्णेसह पंचगंगा, वारणा, दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्यात वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.
तालुक्याला वरदान ठरलेला शिरोळ बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होते. संततधार पावसामुळे यावर्षी दुसऱ्यांदा हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची चारा कापणीसाठी तसेच विद्युत मोटर काढण्यासाठी धावपळ उडाली आहे. धरणक्षेत्रासह परिसरात कोसळणाऱ्या
पावसामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
फोटो - १३०७२०२१-जेएवाय-०९
फोटो ओळ - शिरोळ बंधारा यावर्षी दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)