शिरोळमधील मातब्बर भाजपमध्ये दाखल

By admin | Published: January 10, 2017 12:43 AM2017-01-10T00:43:00+5:302017-01-10T00:43:00+5:30

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश : सर्वांना सन्मानाची पदे देणार : फडणवीस

In the Shirol section, | शिरोळमधील मातब्बर भाजपमध्ये दाखल

शिरोळमधील मातब्बर भाजपमध्ये दाखल

Next

शिरोळ : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, दलितमित्र अशोकराव माने, नृसिंहवाडीचे उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांच्यासह जयसिंगपूर बाजार समिती सदस्य, सरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी अशा सुमारे १२० जणांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता शिरोळ तालुक्यातील या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. सर्वांना सन्मानाची पदे दिली जातील, शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच जिल्ह्यांत सकारात्मक अशा प्रकारचे काम सुरू आहे. या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. आपल्याला राजकारण नाही, तर समाजकारण करायचे आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
कागलनंतर शिरोळ तालुक्यात राजकीय भूकंप करण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून भाजपचे प्रयत्न सुरू होते. नव्या वर्षात आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या प्रयत्नाला शिरोळमध्ये यश आले. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिरोळ तालुक्यातील सुमारे १२० जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, आमदार सुरेश हाळवणकर, बाबा देसाई, सुरेशदादा पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज मगदूम, नगराध्यक्ष डॉ. नीता माने, नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम, भाजपचे तालुकाध्यक्ष धैर्यशिल देसाई, रामचंद्र डांगे, विजय भोजे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

१२० जणांचा प्रवेश
मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या चार प्रमुख नेत्यांबरोबर आगरच्या सरपंच लक्ष्मी लोंढे, तमदलगे सरपंच सुरेखा कांबळे, शिरोळ सरपंच सुवर्णा कोळी, यड्राव सरपंच उषा तासगावे, राम खोत, बाळासाहेब शेख यांच्यासह सुमारे १२० जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यात भाजपला पक्षवाढीसाठी बळ मिळाले आहे.

Web Title: In the Shirol section,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.