शिरोळ तालुका संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:45+5:302021-05-14T04:23:45+5:30
दत्तवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथे परिचारिका दिनाच्या निमित्ताने भारतीय मजदूर संघ कोल्हापूर यांच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ...
दत्तवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथे परिचारिका दिनाच्या निमित्ताने भारतीय मजदूर संघ कोल्हापूर यांच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका, आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच मयूर खोत, पोलीस पाटील अजितसिंह खोत, राकेश कागले, खंडू भोरे, रोहित वसवाडे, कृष्णा कांबळे, रावसाहेब आरगे उपस्थित होते.
-
आरक्षण बचाव कृती समितीचे निवेदन
शिरोळ : पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केल्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, तसेच मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयास देण्यात आले. यावेळी विश्वजित कांबळे, अमित वाघवेकर, नितीन कांबळे, प्रवीण शिंदे, सुनील कांबळे, केवल कांबळे उपस्थित होते.
कोविड नियमांचे पालन करा : कुंभोजकर
शिरोळ : तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. दररोज १५० स्रावची तपासणी केली जात असून, त्यापैकी पंधरा ते वीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र कुंभोजकर यांनी केले आहे.