शिरोलीत महामार्ग रोखला

By admin | Published: February 23, 2016 12:56 AM2016-02-23T00:56:30+5:302016-02-23T01:02:26+5:30

हद्दवाढीविरोधात आंदोलन : दीड तास वाहतूक विस्कळीत, बंद मागे; उपोषण सुरूच

Shiroli highway stopped | शिरोलीत महामार्ग रोखला

शिरोलीत महामार्ग रोखला

Next

शिरोली : महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीस विरोध करत शिरोली व नागावच्या ग्रामस्थांनी सुमारे चाळीस मिनिटे सांगली फाटा येथे पुणे-बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग रोखला. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती.
यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीतून शिरोली वगळून, एमआयडीसीसह शिरोलीस स्वतंत्र नगरपालिका मंजूर करावी, ही आमची गेल्या वीस वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी गेल्या चार दिवसांपासून शिरोली गावात कडकडीत बंद पाळण्यात आला, हे आंदोलन कौतुकास्पद व इतर गावांना अनुकरणीय आहे.
शहराच्या हद्दवाढीसंदर्भात योग्यरितीने व कायदेशीर बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य सरकारला केली होती. त्यास अनुसरून अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत व हद्दवाढीची सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करावी म्हणून राज्य सरकारला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.
संकट गेल्या आंदोलन मागे नाही
आमदार डॉ. मिणचेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हद्दवाढ विरोधी कृती समितीने बेमुदत बंद मागे घेतला आहे. यामुळे गावातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली आहेत. कृती समितीने साखळी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हद्दवाढीचे संकट गाडल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याचे कृती समितीचे महेश चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Shiroli highway stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.