जिल्ह्यातून शिरोली पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांकाचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:38+5:302021-07-19T04:17:38+5:30
पोलीस दलाच्या कामकाजात निकोप स्पर्धा वाढावी तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिद्धी प्रमाण यांमध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने ...
पोलीस दलाच्या कामकाजात निकोप स्पर्धा वाढावी तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिद्धी प्रमाण यांमध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने देशपातळीवर सर्वोत्कृष्ट १० पोलीस ठाण्याची ‘बेस्ट पोलीस स्टेशन’ म्हणून निवड करण्यात येणार असून, कोल्हापूर जिल्ह्यातून शिरोली पोलीस ठाण्याची निवड केली आहे.
पोलिसांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून जुना राजवाडा व शिरोली पोलीस ठाण्यांची निवड करण्यात येऊन पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांना माहिती सादर केली होती. कोल्हापूर परिक्षेत्राच्या वतीने शिरोली पोलीस ठाणे व सांगलीतील करकंब पोलीस ठाणे यांची निवड केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या परिक्षेत्रात २०० हून पोलीस ठाणी आहेत. यांतून शिरोली आणि करकंब या दोन पोलीस ठाण्यांची निवड झाली आहे. सन २०१९ आणि २०२१ या दोन वर्षांत केलेल्या कामावर ही निवड केली आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, करवीर उपअधीक्षक राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली, असे साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी सांगितले.
फोटो ओळी :-
किरण भोसले (साहाय्यक पोलीस निरीक्षक, शिरोली)