शिरोली एसएसटी पथकाने केली 62 लाख ६८ हजार ४४ रुपयांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 03:22 PM2019-04-08T15:22:07+5:302019-04-08T15:41:49+5:30
शिरोली एसएसटी नाका येथे नाकाबंदी दरम्यान मारुती ओम्नी मोटार कार एम एच 06 ए एफ 2361 मधून नेली जात असलेली 62,68,044/- रु ची रोकड पकडण्यात आली आहे
कोल्हापूर- शिरोली टोल नाका येथे एसएसटी पथकाने आज सोमवारी दुपारी 1च्या दरम्यान तावडे हाॅटेल कडुन शहरात प्रवेश करणारी मोटार कार (एम एच 06 ए एफ 2361) नाकाबंदी वरील कर्मचारी यांनी तपासली असता त्यामध्ये 62 लाख ६८ हजार ४४ रुपयांची रोकड आढळून आली.
सदरची रक्कमे बाबत गाडीचा चालक शशिकांत भीमा चिगरी, वय 28 वर्षे, रा. पाचगाव, जि. कोल्हापूर याचेकडे चौकशी केली असता त्यांने रक्कमे बाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. सदरची रक्कम शाहूपुरी पोलीसांनी कलम 102 नुसार पंचनामा करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे.या रक्कमे बाबत संशयीत कोणतीच माहीत देत नाही. रकमेबाबत विचारपूस करून वैध कागदपत्रे सदर करण्यास सांगितले असता त्यांनी असमर्थता दर्शविल्याने रक्कम कलम 102 सी आर पी सी प्रमाणे पंचनामा करून पुढील कारवाई साठी आयकर विभागाला कळविण्यात आले असुन. सदरची कारवाई नाकाबंदी साठी उपस्थित असणारे पो नि संजय मोरे, हर्षजीत घाटगे, नोडल ऑफिसर, आचारसहिंता व्यवस्थापन, 276. विधानसभा मतदारसंघ, पो उप निरीक्षक रणजित पाटील, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे स फौ संदीप जाधव, पो हे कॉ तानाजी चौगुले, पो कॉ अजय नाईक, म पो कॉ रुपाली कांबळे, शवाशा चे पो कॉ काळोखे, मुख्यालयाचे म पो कॉ इंगवले तसेच एस एस टी पथकाचे वि का दंडाधिकारी विजयकुमार घाडगे, म पो कॉ वळवी, पो हवा. फलके, व्हिडिओग्राफर पांडुरंग बिरांजे यांनी केली.