शित्तूर-वारुण--जिंकल्यानंतर गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी
By admin | Published: February 23, 2017 07:26 PM2017-02-23T19:26:54+5:302017-02-23T19:26:54+5:30
अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणूकीत शिवसेनेच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार यांना पराभवास सामोरे जावे लागले.
शित्तूर-वारुण : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शित्तूर-वारूण या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात जनसुराज्य, काँग्रेस व भाजपा आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सजेर्राव पाटील (पेरिडकर) यांनी शिवसेनेचे रणवीरसिंग गायकवाड यांचा तब्बल २२३१ मतांनी पराभव केला. तर पंचायत समितीचे जनसुराज्य आघाडीचे उमेदवार विजय खोत यांनी शिवसेनेच्याच भिमराव पाटील यांना ३९ मतांनी पराभूत केले. त्यांच्या विजयाची बातमी कळताच शित्तूर-वारूणसह परिसरामध्ये एकच जल्लोष करण्यात आला. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणूकीत शिवसेनेच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार रणवीरसिंग गायकवाड व पंचायत समिती उमेदवार भिमराव पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागले. शित्तूर-वारूण हा गड राखण्यात शिवसेना सपशेल अपयशी ठरली. या निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील, मानसिंगराव गायकवाड तर जनसुराज्यचे मा. मंत्री विनय कोरे, करणसिंह गायकवाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये मा. मंत्री विनय कोरे यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध केले. शित्तूर-वारूणसह परिसरात सर्वत्र ठिकठिकाणी चौका-चौकात विजयी उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण केली. (वार्ताहर)