डोंगराळ भागातील शित्तूर-वारूण बनले हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:34+5:302021-06-26T04:18:34+5:30

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले गावभर फिरत असल्यामुळे संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाच्यावतीने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी 'रॅपिड अँटिजन टेस्ट' ...

Shittur-Varun became a hotspot in the hilly areas | डोंगराळ भागातील शित्तूर-वारूण बनले हॉटस्पॉट

डोंगराळ भागातील शित्तूर-वारूण बनले हॉटस्पॉट

Next

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले गावभर फिरत असल्यामुळे संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाच्यावतीने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी 'रॅपिड अँटिजन टेस्ट' मोहीम राबवण्यात येत असली तरी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले नागरिक या तपासणीला सहकार्य करत नाहीत. किंबहुना तपासणी करून घेण्यालाच ते तयार होत नसल्यामुळे व अनेकांकडून दक्षतेचे नियमच पाळले जात नसल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत चालली आहे.

शारीरिक अंतर, मास्कचा नियमितपणे वापर व कोरोनाच्या बाबतीतील शासनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर कोणाचीच जरब राहिली नसल्यामुळे ग्रामस्थांनीच आता दक्षता घेऊन वाढत्या कोरोनाला आवर घालण्याची गरज आहे. कालपर्यंत १४ असलेली रुग्णसंख्या आज ३४ झाली असून गाव सध्या कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरले आहे.

नीता पाटील (सरपंच-शित्तूर-वारूण)

उद्यापासून गावात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सगळे व्यवहार पूर्णता बंद राहतील. लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी उद्यापासून गावामध्ये चार सुरक्षारक्षक काम करतील.

Web Title: Shittur-Varun became a hotspot in the hilly areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.