कोल्हापूर जिल्ह्यातील आठ खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 01:41 PM2024-10-04T13:41:53+5:302024-10-04T13:42:12+5:30
कोल्हापूर : क्रीडा आणि खेळासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना सरकारने राज्य पुरस्कार गुरूवारी जाहीर केले. शालेय शिक्षण आणि ...
कोल्हापूर : क्रीडा आणि खेळासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना सरकारने राज्य पुरस्कार गुरूवारी जाहीर केले. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने पुरस्काराची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश आहे.
या पुरस्कारात राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) आणि राज्य क्रीडा साहसी पुरस्कार जाहीर केले. सन २०२२-२३ वर्षातील हे पुरस्कार असून, त्यासाठी ९ फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्यस्तर पुरस्कार निवड समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन पुरस्कार जाहीर करण्यात आले.
राज्यातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कारात कोल्हापूरची वर्णी लागली आहे. त्यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार कस्तुरी सावेकर यांना जाहीर करण्यात आला तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारात (दिव्यांग खेळाडू) कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
खेळाचे नाव / खेळाडू
सायकलिंग / प्रतीक संजय पाटील
नेमबाजी (शूटिंग)/ शाहू तुषार माने
कुस्ती (रेसलिंग)/ नंदिनी बाजीराव साळोखे
रग्बी / वैष्णवी दत्तात्रय पाटील, श्रीधर श्रीकांत निगडे
शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार
साहस प्रकार/ खेळाडू
जमीन/ कस्तुरी दीपक सावेकर
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)
जलतरण/ अफ्रीद मुख्तार अत्तार
ॲथलेटिक्स/ अन्नपूर्णा सुनील कांबळे