kolhapur: शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर शिवभक्तांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 07:33 PM2023-04-21T19:33:05+5:302023-04-21T19:33:23+5:30

सकाळी शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा होणार

Shiv devotees crowd at Panhalgad to carry Shiv Jyot for Shiv Jayanti | kolhapur: शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर शिवभक्तांची गर्दी 

kolhapur: शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर शिवभक्तांची गर्दी 

googlenewsNext

नितीन भगवान

पन्हाळा: जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषनांनी पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले आहे. उद्या, शनिवारी (दि,२२) साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक शिवजयंतीसाठी पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यासाठी गेले दोन दिवसांपासून गडावर शिवभक्तांची गर्दी झाली आहे.

पन्हाळगडावर शिवमंदिर असून या ठिकाणाहून शिवज्योत नेण्याची पद्धत आहे. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापुर सह कर्नाटक, राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यासाठी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने प्रत्येक शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्याची व्यवस्था केली होती. त्याच बरोबर शिवमंदिर, बाजीप्रभू, शिवाकाशिद याठिकाणी केलेली विद्युत रोषणाई पहायला गर्दी झाली होती. तसेच येणाऱ्या शिवभक्तांसाठी लाईट, पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. शिवजंयतीसाठी गडावरुन सुमारे १२०० ते १५०० शिवज्योती नेण्यात येतात.  

दरम्यान, उद्या शनिवारी शिवजंयतीनिमित्त पन्हाळा येथे सकाळी शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे.  शिवजयंती उत्सवा निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येत असल्याचे संयुक्त शिवजयंती मंडळाने जाहीर केले आहे. तर सायंकाळी पारंपारिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

Web Title: Shiv devotees crowd at Panhalgad to carry Shiv Jyot for Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.