Kolhapur News: ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 06:10 PM2023-02-18T18:10:27+5:302023-02-18T18:10:51+5:30

पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले

Shiv devotees flock to carry the Shiva Jyoti from the historic Panhala Fort | Kolhapur News: ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी 

Kolhapur News: ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी 

Next

नितीन भगवान

पन्हाळा: 'जय भवानी, जय शिवाजी'' छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जय घोषाने पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले आहे. उद्या, रविवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यासाठी गेले दोन दिवसांपासूनच गडावर शिवभक्तांची गर्दी झाली आहे.

महाराष्ट्रातील एकमेव शिवमंदिर पन्हाळगडावर असून या ठिकाणाहून शिवभक्त शिवज्योत नेतात. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर मोठी गर्दी झाली होती. यासाठी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने प्रत्येक शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शिवमंदिर, बाजीप्रभू, शिवाकाशिद याठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाई पहायला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच येणाऱ्याशिवभक्तांसाठी लाईट, पाणी याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पन्हाळ्याहून शिवजयंतीसाठी १२०० ते १५०० शिवज्योती नेण्यात येतात.  

दरम्यान, उद्या रविवारी शिवजंयती निमित्त सकाळी शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे. तर, शिवजयंती उत्सवा निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

Web Title: Shiv devotees flock to carry the Shiva Jyoti from the historic Panhala Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.