शिवजयंती, बसवेश्वर जयंती उत्साहात

By admin | Published: April 29, 2017 12:45 AM2017-04-29T00:45:07+5:302017-04-29T00:45:07+5:30

शिवजयंती, बसवेश्वर जयंती उत्साहात

Shiv Jayanti, Basaveshwar Jayanti excited | शिवजयंती, बसवेश्वर जयंती उत्साहात

शिवजयंती, बसवेश्वर जयंती उत्साहात

Next


जिल्ह्यात शिवमय वातावरण : प्रतिमांचे पूजन, विशाळगड, पन्हाळा येथून शिवज्योतीचे आगमन, सामाजिक उपक्रम
शिरोळ/अर्जुनवाड : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर जयंती विविध मंडळांकडून मोठ्या उत्साहात साजरी करणेत आली. यानिमित्त ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे तसेच पुतळ््याचे पूजन मान्यवरांकडून करण्यात आले. गुरूवारी मध्यरात्रीपासून काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विशाळगड, पन्हाळ्यावरून शिवज्योत आणून त्याची मिरवणूक काढली होती. तसेच पोवाडे, भगवे झेंडे, पताक्यांनी परिसर भगवा बनला होता. सायंकाळी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून, आकर्षक विद्युत रोषणाईत, बैलगाड्या व ढोल-ताशांच्या निनादात शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत या शोभायात्रा सुरू होत्या. शिरोळसह परिसरात शिवजयंती व बसवेश्वर जयंती विविध मंडळाकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडुन करण्यात आले. अर्जुनवाड येथील शिवाजी चौकात सार्वजनिक शिवजयंती मंडळाकडून कुमार कागवाडे यांच्या हस्ते मूर्तीपूजन झाले. त्याचबरोबर मराठा महासंघातील पूजन अशोक पाटोळे, संजय यादव यांच्यासह तरूण भारत मंडळ, छत्रपती शिवाजी मंडळ, शिवसेना शाखा, हनुमान चौकात प्रशांत कोळी व उस्मान मुल्ला यांनी शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराज यांचे फोटो पूजन केले.
ग्रामपंचायत कार्यालयातही शिवजयंती व बसवेश्वर जयंती करण्यात आली. याप्रसंगी अनुप पाटील, सागर पाटील, गजानन पाटील, राजू गुरव, अमर गायकवाड, विशाल सूर्यवंशी, संकल्प परीट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेरवाड (ता. शिरोळ) येथील एकता चौकात सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पिंटू हुक्कीरे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. यावेळी विकास माळी, श्रेणिक ढोणे, विशाल जाधव, सुरज नरगट्टे, सुशांत माळी, चव्हाण, अमीर नदाफ, अष्पाक नदाफ, निखिल कोरवी, दिलावर नदाफ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Jayanti, Basaveshwar Jayanti excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.