शिवसेनेच्या वतीने दहीहंडी ऐवजी शिवसहाय्य हंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:49 AM2021-09-02T04:49:23+5:302021-09-02T04:49:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेनेच्या वतीने मंगळवारी शिवाजी चौक येथे होणारी दहीहंडी रद्द ...

Shiv Sahayya Handi instead of Dahihandi on behalf of Shiv Sena | शिवसेनेच्या वतीने दहीहंडी ऐवजी शिवसहाय्य हंडी

शिवसेनेच्या वतीने दहीहंडी ऐवजी शिवसहाय्य हंडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार शिवसेनेच्या वतीने मंगळवारी शिवाजी चौक येथे होणारी दहीहंडी रद्द करुन शिवसहाय्य हंडी केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने काेरोना व महापुरामुळे अडचणीत आलेल्या कलावंतांना मदत वाटप करण्यात आली.

कलावंत, गायक, वादक, नर्तक हे सर्व कलाकार केवळ त्यांच्या अंगी असलेल्या कलेवरच उदरनिर्वाह करतात;मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वच कलावंत रोजगारापासून वंचित आहेत. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील यंदाची महापूर आणि लॉकडाऊन स्थिती यामुळे सर्वत्र सण, समारंभ, जत्रा, लग्नकार्ये न झाल्याने त्यावर अवलंबून असणारे कलाकार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे या कलाकारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत गंभीर बनली आहे. अशा ६० कलावंतांना या मदतीचे वाटप युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, युवा सेनेचे हर्षल सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवसेना शाखाप्रमुख कपिल केसरकर, राहुल अपराध, संयुक्त छत्रपती शिवाजी महाराज चौक रिक्षा मित्र मंडळाचे अध्यक्ष संभाजी पाटील, केदार भुर्के, राकेश माने, शैलेश हिरासकर, निहाल मुजावर, रुपेश डोईफोडे, मुबीन मुश्रीफ, रोहित गवंडी, सुहेल बागवान, अभिजित कदम आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी हर्षल सुर्वे, जयवंत हारुगले, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित हाेते. (फोटो-३१०८२०२१-काेल-शिवसेना)

Web Title: Shiv Sahayya Handi instead of Dahihandi on behalf of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.