आमचं ठरलंय; कोल्हापूरचे शिवसैनिक घराच्या दारात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा केक कापणार!

By समीर देशपांडे | Published: July 23, 2022 02:12 PM2022-07-23T14:12:50+5:302022-07-23T14:31:35+5:30

ठाकरे यांच्या वाढदिनी जिल्ह्यातून १ लाख सभासद नोंदणी केली जाणार आहे.

Shiv Sainik of Kolhapur will cut the birthday cake of Uddhav Thackeray at the door of the house | आमचं ठरलंय; कोल्हापूरचे शिवसैनिक घराच्या दारात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा केक कापणार!

आमचं ठरलंय; कोल्हापूरचे शिवसैनिक घराच्या दारात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा केक कापणार!

Next

कोल्हापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळेच त्यांना पाठबळ देण्यासाठी २७ जुलै रोजी त्यांच्या वाढदिनी शिवसैनिक आपल्या दारात कुटुंबाच्यावतीने केक कापणार आहेत. जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

पवार म्हणाले, धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे अनेकांची फसगत होणार आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या एजन्सींकडून सुरू असलेल्या फोडोफोडीला कोणी बळी पडू नये. देवणे म्हणाले, राधानगरी येथील आमदार फुटले असले तरी शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. त्यामुळेच या तालुक्यात २५ हजार शिवसैनिकांची नोंदणी करणार आहोत. ठाकरे यांच्या वाढदिनी जिल्ह्यातून १ लाख सभासद नोंदणी केली जाणार आहे.

कोल्हापूर शहरामध्येही प्रत्येक प्रभागामध्ये जुन्या आणि नव्यांचा समावेश करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यापत्रकार परिषदेस शहरप्रमुख रवि इंगवले. सुनील मोदी, हर्षल सुर्वे यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेत बंडाळीनंतर दोन गट पडले आहेत. सद्या शिंदे गटात सामील होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या समर्थनातही शिवसैनिकांची संख्या मोठी आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सुरु केलेल्या शिव संवाद यात्रेलाही शिवसैनिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र आगामी निवडणुकीतच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Shiv Sainik of Kolhapur will cut the birthday cake of Uddhav Thackeray at the door of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.