शिवसेना व निष्ठा या एकाच नाण्याच्या दोन बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:43+5:302021-07-09T04:16:43+5:30

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ...

Shiv Sena and Nistha are two sides of the same coin | शिवसेना व निष्ठा या एकाच नाण्याच्या दोन बाजू

शिवसेना व निष्ठा या एकाच नाण्याच्या दोन बाजू

Next

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी मुरलीधर जाधव यांची नियुक्ती होणे, ही बाब सहकार पट्ट्यातील शिवसेना व शिवसैनिक बंधू-भगिनींसाठी चैतन्यमय बाब आहे. आमचा मुरलीधर गोकुळात गेला याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे उद्गारही मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढले. तसेच गोकुळच्या माध्यमातून सहकारातून समाजकारणाचा एक नवा पॅटर्न आपण राबवावा व पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करावे, अशा शुभेच्छाही या वेळी त्यांनी दिल्या. शिवसेनेत अनेक सामान्य शिवसैनिकांना असामान्य पदापर्यंत पोहोचता आले, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव असल्याची शाबासकीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

या वेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, मधुकर पाटील, नामदेव गिरी व अर्जुन मुरलीधर जाधव उपस्थित होते.

फोटो ओळी-कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी साताप्पा भवान, मधुकर पाटील, नामदेव गिरी व अर्जुन मुरलीधर जाधव उपस्थित होते.

०८ हुपरी मुरलीधर जाधव

Web Title: Shiv Sena and Nistha are two sides of the same coin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.