शिवसेनेने राष्ट्रीय महामार्ग रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 07:27 PM2021-03-19T19:27:09+5:302021-03-19T19:30:36+5:30
Belgon Karnataka shivsena Kolhpapur- बेळगांव महापालिकेसमोर लाल पिवळा झेंडा फडकविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेने सायंकाळी उचगांव पेट्रोलपंप येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला. कर्नाटकची वाहने आडवून भगव्या रंगाने जय महाराष्ट्र असे लिहण्यात आले. शनिवारी बंदवेळी एकही कर्नाटकचे वाहन येथून जावू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
कोल्हापूर : बेळगांव महापालिकेसमोर लाल पिवळा झेंडा फडकविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेने सायंकाळी उचगांव पेट्रोलपंप येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला. कर्नाटकची वाहने आडवून भगव्या रंगाने जय महाराष्ट्र असे लिहण्यात आले. शनिवारी बंदवेळी एकही कर्नाटकचे वाहन येथून जावू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
बेळगांव महापालिकेतील लाल आणि पिवळा रंगाचा ध्वज हटविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन पुकारले आहे. शनिवारी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील कन्नाड व्यावसायिकांचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापू शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी उचगांव येथील पेट्रोल पंपा समोरी पुणे बेंगोलर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
कर्नाटक वाहने अडवून त्यांच्यावर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र असे लिहून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. शनिवारी कोल्हापूर, सांगली आणि सातारामध्ये कर्नाटकचे एकही वाहन फिरु देणार नाही, असा इशाराही देण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, शिवाजी जाधव, राजू यादव, मंजित माने, शशि बिडकर, प्रतिक क्षीरसागर, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.