कागल तालुक्यात गावागावांत शिवसेनेच्या शाखा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:36+5:302021-07-29T04:24:36+5:30
: मुरगूडमध्ये शिवसंपर्क अभियानाची सांगता मुरगूड : निवडणुकीच्या तोंडावर जनतेकडे न जाता शिवसेनेच्या माध्यमातून विविध कामांच्या माध्यमातून संपर्क ...
: मुरगूडमध्ये शिवसंपर्क अभियानाची सांगता
मुरगूड : निवडणुकीच्या तोंडावर जनतेकडे न जाता शिवसेनेच्या माध्यमातून विविध कामांच्या माध्यमातून संपर्क ठेवणे महत्त्वाचे आहे. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीमध्ये सेनेची सत्ता येण्यासाठी पक्ष संघटन गरजेचे आहे. त्यामुळेच शिवसेना व युवा सेनेची कागल तालुक्यात गाव तिथे शाखा निर्माण करून कार्यकर्त्यांचे संघटन करण्याचा संकल्प ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी केला. मुरगूड (ता. कागल) येथे नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या शिवसंपर्क अभियानाच्या जिल्ह्यातील समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात साठ ठिकाणी शिवसंपर्क अभियान पार पडले. यावेळी कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, नगरपरिषदेचा आरोग्य विभाग, वीज वितरणचे कर्मचारी, रेस्क्यू फोर्स, अग्निशमन दल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, नगराध्यक्ष राजेखान जमादार, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती शिवानी भोसले, पंचायत समिती सदस्य विजय भोसले, उपनगराध्यक्ष रंजना मंडलिक, संदीप कलकुटकी, हेमलता लोकरे, प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, रूपाली सनगर, वर्षाराणी मेंडके, अनिता राऊत, शिवसेना तालुका उपप्रमुख मारुती पुरीबुवा उपस्थित होते.
चौकट : शिवपुतळा लवकरच
मुरगूडमध्ये एस. टी. स्टँड परिसरात उभा केला जाणारा शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा तयार झाला आहे. चबुतरा व सुशोभीकरण लवकरच सुरू होईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असल्याचे वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितले.
फोटो :
ओळ
मुरगूड (ता. कागल) येथील शिवसेना पक्षाने राबविलेल्या शिवसंपर्क अभियानाच्या समारोप कार्यक्रमात कोरोना काळात चांगले काम केलेल्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना वीरेंद्र मंडलिक, विजय देवणे, नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्षा रंजना मंडलिक.