शिवसेनेने तात्या, दादांऐवजी गावं उभी केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:38+5:302021-07-15T04:18:38+5:30
साके : शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेने तात्या, दादा, आप्पा न घडविता केवळ सर्वसामान्य माणसाला प्रमाण म्हणून गावं उभा केली असल्याचे ...
साके : शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेने तात्या, दादा, आप्पा न घडविता केवळ सर्वसामान्य माणसाला प्रमाण म्हणून गावं उभा केली असल्याचे प्रतिपादन कागल तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार, अन्नपूर्णा शुगरचे चेअरमन संजय घाटगे यांनी केले. करनूर, सुळकूड येथे आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुळकूडचे माजी सरपंच अण्णासो चौगुले होते.
घाटगे म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक श्रृखंलेतून आणि कर्तृत्वातून आज महाराष्ट्र ताट मानाने उभा राहिलेला आहे. त्यांचे विचार आणि आचार प्रमाण मानून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आज तेवढ्याच प्रखरतेने महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहेत. आज संपूर्ण जगासह महाराष्ट्रात कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातलेले असतानाही मुख्यमंत्र्यांच्या केवळ पारदर्शक कारभारामुळेच आज महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घोडदौड अखंडपणे सुरू आहे. विजय देवणे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान राबविण्याचे दिलेल्या आदेशाचे गावागावांत आज स्वागत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख, पदाधिकारी, महिला तालुकाप्रमुख, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने पक्षवाढीसाठी काम करत आहेत. या कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, कागल विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख दिनकरराव जाधव मुंबई, कागल तालुका शिवसेनाप्रमुख शिवगोंड पाटील, मंजिरी पाटील ग्रा. पं. सदस्या करनूर, वसुंधरा पाटील महिला शाखाप्रमुख करनूर, भाऊसो पाटील, भाऊसाहेब नलवडे, राजू भोसले, अरविंद चौगुले, विठ्ठल कांबळे, ग्रामपंचायतीचे सदस्य, तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब पाटील करनूर यांनी केले.
सुळकूड (ता. कागल) येथे आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियानात बोलताना संजय घाटगे. शेजारी विजयराव देवणे, संभाजी भोकरे, शिवगोंड पाटील, इतर मान्यवर.