कुडित्रेत शिवसेना-काँग्रेसमध्ये फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:38+5:302020-12-24T04:23:38+5:30
कुडित्रे गावात तसे गट-तट असले तरी, काँग्रेस, शिवसेना अशी पक्षीय सुप्त राजकीय समीकरणे नेहमी आकाराला येतात. पण यावेळी ज्येष्ठ ...
कुडित्रे गावात तसे गट-तट असले तरी, काँग्रेस, शिवसेना अशी पक्षीय सुप्त राजकीय समीकरणे नेहमी आकाराला येतात. पण यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी भावकीचे राजकारण व युवा नेतृत्वाला विचारात घेतले नसल्याचा आरोप करत, दोन्ही गटातील राजकीय ताकद असणाऱ्या युवकांनी पक्षाचा विचार न करता सोयीची पॅनेल बांधणी केली आहे. लढत दुरंगी होणार असली तरी, टोकाच्या विरोधात जाऊन राजकारण करणाऱ्यांच्यात विचित्र राजकीय युती झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
विद्यमान सरपंच विजय पाटील व माजी सरपंच काँग्रेसचे बाळ पाटील यांनी मागील निवडणुकीत विरोधात निवडणूक लढवली होती. पण यावेळी हे आजी-माजी सरपंच एकत्र आले आहेत. काँग्रेसचे यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, बाजार समितीचे माजी सभापती संभाजी आकाराम पाटील, तर शिवसेनेचे ‘कुंभी’चे संचालक ॲड. बाजीराव शेलार, विद्यमान सरपंच विजय पाटील यांनी एकत्र येत पॅनेल बांधणी केली आहे.
दुसरीकडे काँग्रेसचेच ‘कुंभी’चे माजी अध्यक्ष संभाजी पाटील व मा. आ. चंद्रदीप नरके यांच्या जवळचे माजी संचालक मदन पाटील हे एकत्र आले असून दोन्ही गटाकडून अंतिम पॅनेल बांधणी झाली आहे.
।। चौकट।।
कुंभी-कासारी कारखान्याच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या गावाच्या राजकारणात जे मित्र झाले आहेत, ते विरोधक व विरोधक गळ्यात गळे घालणार आहेत, हे नक्की चित्र पाहायला मिळणार आहे. प्रभाग - ४
सदस्य - ११
मतदान - ३,४९५