कर्जमुक्त शेतकऱ्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 04:11 PM2020-03-11T16:11:27+5:302020-03-11T16:29:38+5:30
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्यानंतर ६० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने बुधवारी लाभार्थी शेतकऱ्याचा सत्कार केला.
कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्यानंतर ६० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने बुधवारी लाभार्थी शेतकऱ्याचा सत्कार केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी ‘शेतकरी कर्जमुक्ती...उध्दव ठाकरेंची वचनपुर्ती’ अशा घोषणा देत फटाक्याची अतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या दारात वाशी (ता. करवीर) येथील शेतकरी मधूकर पाटील, निखील हजारे, निलेश जाधव, हिंदूराव पाटील, राजाराम पाटील, संभाजी चपाले, दिलीप चपाले, यशवंत मेथे, निलेश हजारे यांचा फेटा, नारळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार संजय पवार व विजय देवणे यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात कर्जमाफीचे काम वेगाने पुर्ण झाल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
माजी आमदार सुरेश साळोखे, उपजिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण, प्रा. सुनिल शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर, बाजीराव पाटील, राजू जाधव, राजू यादव, शशिकांत बीडकर, दिलीप देसाई, राजेंद्र पाटील, सुनिल पोवार, रणजीत आयरेकर, शुभांगी पोवार, गीतांजली गायकवाड, मेघना पेडणेकर, दिपाली शिंदे, कमल पाटील आदी उपस्थित होते.