शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवसेनेतर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:54+5:302021-08-17T04:28:54+5:30

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचा रविवारी अमृत महोत्सव होता. या पुतळ्यास राज्य नियोजन ...

Shiv Sena greets the statue of Shivaji Maharaj | शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवसेनेतर्फे अभिवादन

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवसेनेतर्फे अभिवादन

Next

कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचा रविवारी अमृत महोत्सव होता. या पुतळ्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर कार्यकर्त्यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या पुतळ्याचे १५ ऑगस्ट १९४७ ला छत्रपती शहाजी महाराज यांच्या हस्ते अनावरण झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा स्वातंत्र्याचा साक्षीदार आहे. यावेळी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी निवृत्ती चौक परिसर दणाणून सोडला.

इतिहासाचा साक्षीदार असणारा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोल्हापूरची अस्मिता आणि कोल्हापूरची ओळख आहे, अशा भावना क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या. या पुतळ्याचे शिल्पकार कलामहर्षी बाबूराव पेंटर तर कोनशिला चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी केली आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, किशोर घाटगे, कपिल सरनाईक, शैलेश साळोखे, रुपेश इंगवले, सुरज साळोखे आदी उपस्थित होते.

फोटो : १६०८२०२१-कोल-क्षीरसागर न्यूज

कोल्हापुरातील निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर कार्यकर्त्यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Web Title: Shiv Sena greets the statue of Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.