पेन्शन बंद झालेल्या हुतात्म्याच्या वारसाच्या मदतीला शिवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:34+5:302021-07-05T04:16:34+5:30

बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मे झालेले स्व. मारुती बेंन्नाळकर यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी बेंन्नाळकर यांना गेल्या काही महिन्यांपासून ...

Shiv Sena to help the legacy of the martyr whose pension was stopped | पेन्शन बंद झालेल्या हुतात्म्याच्या वारसाच्या मदतीला शिवसेना

पेन्शन बंद झालेल्या हुतात्म्याच्या वारसाच्या मदतीला शिवसेना

Next

बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मे झालेले स्व. मारुती बेंन्नाळकर यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी बेंन्नाळकर यांना गेल्या काही महिन्यांपासून पेन्शन बंद असल्याच्या वृत्ताची सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दखल घेतली आहे. ठाण्यातील डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून हुतात्मा स्व. मारुती बेंन्नाळकर यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी बेंन्नाळकर यांस आज ५१ हजार रुपयांची थेट आर्थिक मदत करण्यात आली. यासोबतच फौंडेशनच्या माध्यमातून बेंन्नाळकर कुटुंबीयास महिनाभराचा शिधा सुपूर्द करण्यात आला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी बेळगाव येथील स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत आज कंगराळी येथील श्रीमती बेंन्नाळकर यांच्या घरी भेट देऊन ही मदत सुपूर्द केली.

सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सीमा भाग समन्वयक मंत्री म्हणून आपण कटिबद्ध आहोंत अशी ग्वाही मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी दिली. सीमा लढ्यात १९८६ साली स्वतः तुरुंगवास भोगल्याने आपली या लढ्याशी कायमस्वरूपी नाळ जोडली गेलेली आहे. या भावनेतूनच आपण सीमा भागातील मराठी बांधवांच्या सोबत असून नेहमीच सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले.

तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून बेळगाव आणि सीमा भागातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक सर्वोतोपरी मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. याअगोदरदेखील डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून बेळगाव येथे एक सुसज्ज रुग्णवाहिका आणि ५ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन देण्यात आली आहेत. आवश्यकता असल्यास आणखी आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनदेखील डॉ. श्रीकांतजी शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे दत्ता (भाऊ) जाधव यांच्या जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील आणि कंग्राळी खुर्द येथील ग्रामस्थ युवक.

स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो: हुतात्म्यांचे पत्नीला मदत देतेवेळी शिवसेना आरोग्य मदत कक्षाचे मंगेश चिवटे, सोबत बेळगाव शिवसेनेचे दत्ता जाधव, आर. आय. पाटील, प्रकाश शिरोळकर आदी.

Web Title: Shiv Sena to help the legacy of the martyr whose pension was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.