फडणवीस टीम महाराष्ट्रात विष पेरते, सुषमा अंधारेंची घणाघाती टीका

By राजाराम लोंढे | Published: November 16, 2022 05:28 PM2022-11-16T17:28:26+5:302022-11-16T17:38:20+5:30

उद्धवजींना पुन्हा सन्मानाने ‘वर्षा’वर पाठवणार

Shiv Sena leader Sushma Andhare criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis during Mahaprabodhan Yatra in Kolhapur | फडणवीस टीम महाराष्ट्रात विष पेरते, सुषमा अंधारेंची घणाघाती टीका

फडणवीस टीम महाराष्ट्रात विष पेरते, सुषमा अंधारेंची घणाघाती टीका

Next

कोल्हापूर : भाजपने द्वेषाचं राजकारण सुरु केले असून ‘आफताब’ व ‘बिल्कीस बानोत’ प्रकरणात धर्म पाहून न्याय करणारी देवेंद्र फडणवीस व त्यांची टीम महाराष्ट्रात वीष पेरण्याचे काम करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. महिलांवर कमरेखालचे वार करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या बगलबच्यांना महाराष्ट्र माफ करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी कोल्हापूरात केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या महाप्रबोधन यात्रेत अंधारे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

अंधारे म्हणाल्या, राज्य व देशात भाजपने सगळे संशयाचे वातावरण तयार केले. जातीजातीमध्ये भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजताना महाराष्ट्र अधोगतीला निघाला याचे भान कोणाला नाही. महाराष्ट्रातील सात प्रकल्प बाहेर गेले. गुजरातला ‘ड्रीम’ सिटी बनवण्यासाठी मुंबईला दुबळी करण्याचा डाव आहे. महाराष्ट्राला भकास करुन लाखो तरुणांना बेरोजगार करण्याचे पाप मुख्यमंत्री शिंदे करत आहेत.

फडणीससाहेब तुमचे वजन आणि उंचीही माहिती आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी टेलिप्रॉम्प्टरवर बोलतात आणि एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात. माझ्या उंचीवरुनही टीका करणारे देवेंद्र फडणवीस, तुमची उंची आणि वजनाही मला माहीती आहे. असा टोला अंधारे यांनी लगावला.

उद्धवजींना पुन्हा सन्मानाने ‘वर्षा’वर पाठवणार

राज्यातील सरकार हे विश्वासघाताने आल्याने ते फार काळ टिकणार नाही. त्यामुळे २०२३ मध्ये मध्यावधी निवडणूक लागतील. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संयमाने ‘वर्षा’ निवासस्थान सोडले. त्यांना पुन्हा सन्मानाने ‘वर्षा’वर पाठवण्याची आम्ही शपथ घेतल्याने अंधारे यांनी सांगितले.

मराठा नेतृत्वाला संपवण्याचा घाट

छातीवर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील सांगतात, यावरुन मराठ्यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी भाजपची नव्हती, हे सिध्द होते. नाईलास्तव मुख्यमंत्री केले, पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार द्यायचे नाही. त्यातून मराठ्यांकडे नेतृत्व करण्याची धमक नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपचा सुरु असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.

Web Title: Shiv Sena leader Sushma Andhare criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis during Mahaprabodhan Yatra in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.