शत्रुला अंगावर घेऊन हरविण्याची शिवसेनेची पध्दत, राजेश क्षीरसागरांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:33 PM2022-03-23T16:33:24+5:302022-03-23T16:33:56+5:30

इथं सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते दिसत आहेत, आता विरोधकांकडे आहे करी कोण असे विचारण्याची वेळ आली असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

Shiv Sena method of defeating the enemy, Rajesh Kshirsagar criticizes BJP | शत्रुला अंगावर घेऊन हरविण्याची शिवसेनेची पध्दत, राजेश क्षीरसागरांची भाजपवर टीका

शत्रुला अंगावर घेऊन हरविण्याची शिवसेनेची पध्दत, राजेश क्षीरसागरांची भाजपवर टीका

googlenewsNext

कोल्हापूर : पाठीमागून वार करण्याची सवय शिवसेनेला नाही, शत्रूला अंगावर घेऊन पुढून वार करुन हरविण्याची आमची मर्दाची पध्दत आहे, अशा शब्दात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

कोल्हापूर उत्तर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या बैठकीत क्षीरसागर बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत, मालोजीराजे छत्रपती, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआर कवाडे गट या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला आहे, आता शिवसैनिक त्यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी करुन दाखवतील, असा ठाम विश्वासही क्षीरसागर यांनी दिला. इथं सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते दिसत आहेत, आता विरोधकांकडे आहे करी कोण असे विचारण्याची वेळ आली असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

Web Title: Shiv Sena method of defeating the enemy, Rajesh Kshirsagar criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.