जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 07:06 PM2021-06-18T19:06:20+5:302021-06-18T19:10:05+5:30

Zp HasanMusrif Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदल केला जाणार आहे; मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झालेले नाहीत. माझी सगळ्यांना विनंती आहे, त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे द्यावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

Shiv Sena office bearers in Zilla Parishad should resign - Hasan Mushrif | जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत - हसन मुश्रीफ

जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत - हसन मुश्रीफ

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले पत्रकार परिषदेत आवाहन

कोल्हापूर : जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदल केला जाणार आहे; मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झालेले नाहीत. माझी सगळ्यांना विनंती आहे, त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे द्यावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदलाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जबाबदारी घेतली आहे. याबाबत शिष्टमंडळ भेटत आहेत; मात्र शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्यास विलंब करत असल्याचे समजले. त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला संधी देताना इतरांना थांबावे लागले होते. आता पदे भोगली आहेत, ठरल्याप्रमाणे राजीनामा दिले पाहिजेत. ग्रामविकास विभागाच्यावतीने निधी देताना आपण कधीही दुजाभाव केलेला नाही. प्रचंड कामे केल्याने पदाधिकाऱ्यांनी समाधानाने राजीनामे द्यावेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

 

Web Title: Shiv Sena office bearers in Zilla Parishad should resign - Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.