खुपिरेत काँग्रेसच्या एकीवर ठरणार शिवसेनेला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:11+5:302020-12-29T04:23:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे -- खुपिरे (ता. करवीर) येथे शिवसेना व काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार आहे. शिवसेनेची असलेली सत्ता ...

Shiv Sena will be challenged on the unity of Congress in Khupire | खुपिरेत काँग्रेसच्या एकीवर ठरणार शिवसेनेला आव्हान

खुपिरेत काँग्रेसच्या एकीवर ठरणार शिवसेनेला आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे -- खुपिरे (ता. करवीर) येथे शिवसेना व काँग्रेसमध्ये सरळ लढत होणार आहे. शिवसेनेची असलेली सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेसमधील असलेल्या गटात एकी झाली तरच शिवसेनेला मोठे आव्हान निर्माण होणार आहे. शिवसेनेच्या सत्तेला शह देण्यासाठी काँग्रेस अंतर्गत असणारी बंडाळी थोपवून सर्व गट एकत्र आणण्याबरोबर उभा केलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची मानसिकता मतदारांच्यात काँग्रेसला करावी लागणार आहे.

करवीर तालुक्यात मोठी असणाऱ्या खुपिरे ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी पक्षीय पातळीवरील नेत्यांनी लक्ष घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथे शिवसेनेच्या गटाचे कुंभी कासारीचे संचालक संजय पाटील, कोजिमाशि पतपेढीचे माजी चेअरमन संजय डी. पाटील व तंटामुक्तचे अध्यक्ष संजय पाटील या तीन संजय यांच्यावर आहे. शिवसेनेचे कट्टर समर्थक असणाऱ्या माजी सरपंच प्रकाश चौगले व सरदार बंगे यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेच्या गटात थोडे चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा खुपिरेत मोठा गट असला तरी प्रत्येकाचा सवता सुभा आहे. शिवसेनेत मात्र एकमुखी नेतृत्व दिसते आहे. काँग्रेस गटासाठी सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसअंतर्गत असणाऱ्या गटांना एकीची मोट बांधावी लागणार आहे.

काँग्रेसमध्ये ‘कुंभी-कासारी’चे माजी चेअरमन सर्जेराव पाटील, माजी संचालक तुकाराम पाटील, बबलू पाटील आणि ग्रामपंचायत निवडणुकीत गावपातळीवर काँग्रेसबरोबर असणारे, पण शिवसेनेचे माजी आ. चंद्रदीप नरके यांचे कुंभी बँकेचे संचालक आनंदा पाटील व के. डी. पाटील गट काँँग्रेसबरोबर जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जर काँग्रेसच्या सर्व गटांची एकी झाली तर ते शिवसेनेला नक्की आव्हान ठरणार आहे.

।। चौकट ।।

**विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना लढणार -- मागील पाच वर्षांत सत्तेत असलेल्या शिवसेनेने ग्रामसचिवालय, हनुमान मंदिरासह तीन मोठी मंदिरे, शाळा नूतनीकरण व पेयजल, गटर्स अशी कोट्यवधींची विकासकामे केल्याचे मुद्दे शिवसेनेकडून मतदारांसमोर ठेवले जाणार आहे.

**पेयजलवरून श्रेयवाद -- गावासाठी चार महिन्यांपूर्वी कार्यान्वित झालेली पेयजल काँग्रेसच्या काळात मंजूर करून आणली असल्याचे सांगताना ही योजना शिवसेनेच्या काळात पुर्ण झाली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. २४ तास पाणी नाही. पूर्ण दाबाने पाणी नळाला येत नाही. अंतर्गत रस्त्याची चाळण झाली आहे. याकडे शिवसेनेच्या काळात दुर्लक्ष झाल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.

----------------------------------

एकूण मतदान ---५,१३८

प्रभाग ---५

सदस्य -- १५

Web Title: Shiv Sena will be challenged on the unity of Congress in Khupire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.