कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेशी जमणार नाही : चंद्रकांतदादा पाटील
By admin | Published: August 10, 2015 12:10 AM2015-08-10T00:10:32+5:302015-08-10T00:10:32+5:30
.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यात राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेत वाद
कोल्हापूर : ‘एकाच घरात राहायचे आणि आरोप करायचे’ हे शिवसेनेचे वर्तन योग्य नाही. त्यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणुकीबाबत राज्य पातळीवरून युतीचा फेरविचार झाला तरी या आरोप करणाऱ्या शिवसेनेशी आपले जमणार नाही, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत लगावला.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यात राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेत वाद जुंपला आहे. ताराराणी आघाडीसमवेत जाण्याचा निर्णय, स्वबळ व आरक्षण आदी मुद्द्यांवरून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. त्याअनुषंगाने भविष्यात राज्य पातळीवर भाजप-सेना युतीबाबत फेरविचार झाला तयार कोल्हापुरात भाजप काय करणार, असे विचारले असता पालकमंत्री पाटील म्हणाले, काळाच्या ओघात काय होईल सांगता येत नाही. मात्र, सध्या तरी, भाजप-ताराराणी आघाडी-स्वाभिमानी-आरपीआय ही आघाडी सक्षमपणे निवडणूक लढविणार आहे. एका घरात राहायचे आणि आरोप करायचे, हे योग्य नाही, असा प्रकार शिवसेनेकडून सुरू आहे.