शिवसेनेचा गोकुळवर धडक मोर्चा, आंदोलकांना गेटवरच अडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 07:15 PM2019-05-13T19:15:40+5:302019-05-13T19:19:46+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) पशुखाद्य दरात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर धडक देण्यात आली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे व अन्य संचालकांनी आंदोलकांना संघाच्या गेटवरच अडविले व बंद असलेल्या गेटमधूनच चर्चा करण्यात आली. अतिरेक म्हणजे त्यांचे निवेदनही लोखंडी गेटच्या फटीतूनच स्वीकारले.
कोल्हापूर/कणेरी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) पशुखाद्य दरात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर धडक देण्यात आली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे व अन्य संचालकांनी आंदोलकांना संघाच्या गेटवरच अडविले व बंद असलेल्या गेटमधूनच चर्चा करण्यात आली. अतिरेक म्हणजे त्यांचे निवेदनही लोखंडी गेटच्या फटीतूनच स्वीकारले.
सकाळी बारा वाजता गोकुळ शिरगाव एम. आय. डी. सी. फाट्यावर शिवसैनिक एकत्र आले. व गोकुळ दूध संघाच्या विरोधात घोषणा देत गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शिवसैनिकांनी गोकुळ दूध संघाच्याच्या गेट वर जाऊन गोकुळ दूध संघाच्या विरोधात घोषणा दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी गेली पंधरा दिवस शिवसेनेच्या वतीने दौरा चालू असताना त्यांनी लक्ष दिले नाही. गोकुळ सांग आणि दुधाची सरसकट दोन रुपये दरवाढ करावी व पशुखाद्याची शंभर रुपये वाढवले दर वाढ कमी करावी.
यावेळी संजय पवार म्हणाले शिवसेनेच्या वतीने जिल्हा पंधरा सुरू आहे सद्यस्थितीत दूध उत्पादन करण्याकरिता खर्च वाढत आहे.पण दुधाचे दर वाढत नाहीत. अनेक वेळा आंदोलन करूनही गोकुळ दूध संघाने शेतकऱ्यांच्या वर अन्याय केला आहे.
यावेळी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह संचालक मंडळाने गेटवर येऊन शिवसेनेचे मागणीचे निवेदन स्वीकारले. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद खोत, राजू यादव ,विराज पाटील, उपतालुकाप्रमुख भगवान कदम, एम टी.पाटील, अक्षय माने , विश्वनाथ वारके, शिवाजीराव जाधव, सरदार तिप्पे,अवधूत साळुंखे, अविनाश शिंदे, दिलीप सूर्यवंशी, युवराज पवार, विद्या गिरी, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिसांचा फौज फाट्यासह चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) पशुखाद्य दरात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयावर धडक देण्यात आली. संभाव्य तणाव लक्षात घेऊन संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे व अन्य संचालकांनी आंदोलकांना संघाच्या गेटवरच अडविले व बंद असलेल्या गेटमधूनच चर्चा करण्यात आली. अतिरेक म्हणजे त्यांचे निवेदनही लोखंडी गेटच्या फटीतूनच स्वीकारले. (छाया : राज मकानदार)