इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:23+5:302021-02-06T04:44:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल- डिझेल व गॅस दरवाढीविरोधात शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने बोंब मारो आंदोलन ...

Shiv Sena's Bomb Maro Andolan against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे बोंब मारो आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल- डिझेल व गॅस दरवाढीविरोधात शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात आले. दाभोळकर कॉर्नरला सायकल व दुचाकी वाहने ढकलत रॅली काढण्यात आली. मोदी सरकार हटाओ देश बचाओ, पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अच्छे दिनच्या नावावर फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर मंदिर येथून सायकल व दुचाकी ढकलत रॅली काढण्यात आली. या परिसराला वळसा घालनू रॅली दाभोळकर कॉर्नर येथे आली. येथे सगळ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात बोंब मारून शासनाचा धिक्कार केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात मागणीचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात हर्षल सुर्वे, मंजित माने, संजय जाधव, नरेश सुळशीक, योगेंद्र माने, विराज पाटील, विनोद खोत, शिवाजी जाधव, स्मिता सावंत, पूजा शिंदे, शुभांगी पोवार, मेघना पेडणेकर, दीपाली शिंदे, ऋतुजा जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले. सागर पाटील हा युवा सेनेचा कार्यकर्ता गॅस सिलिंडर घेऊनच आला होता.

--

मोदी सरकार हे तर कोरोनाचे संकट

जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, अच्छे दिनचे वचन देऊन आलेल्या सरकरने नागरिकांना बुरे दिन दाखवले आहेत. ना शेतकरी खुश आहे ना सर्वसामान्य लोक, ना कामगार वर्ग. पेट्रोल, डिझेलने शंभरी गाठली आहे. लोकांनी जगायचे कसे, कोरोनाचे संकट ज्याप्रमाणे सुरू आहे तसेच या देशावर मोदी सरकारचे संकट आहे.

फोटो नं ०५०२२०२१-कोल-शिवसेना आंदोलन०१,०३

ओळ : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शुक्रवारी कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथे शिवसेनेच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात आले. यात महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. (छाया : नसीर अत्तार)

--

०२

एक कार्यकर्ता गॅस सिलिंडर घेऊनच आंदोलनात आला होता. (छाया : नसीर अत्तार)

--

Web Title: Shiv Sena's Bomb Maro Andolan against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.